श्रद्धेय बाबा आमटे जयंती निमित्त वरोऱ्यात हृदयरोग व सर्व रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

258

🔹स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे यशस्वी आयोजन, जवळपास एक हजार नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

🔸शिबिरात पथनाट्य द्वारे जनजागृती करणाऱ्या मुलींचा सत्कार, गरीब व गरजू शिबिराच्या लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया व उपचाराला आर्थिक सहाय्य तथा दिव्यांगांना सायकल वाटप

 ✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

 वाघेडा (दि.27 डिसेंबर):- श्रद्धेय बाबा आमटे जयंती निमित्त काल (दिनांक २६ डिसेंबर) रोजी ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत वरोरा येथील साई मंगल कार्यालयात भव्य हृदयरोग व सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंगल कार्यालयात सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. असून या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा उपाध्यक्ष एड. मोरेश्वरराव टेमुर्डे उपस्थित होते.

त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे, कार्यवाह प्रा. धनराज आस्वले, माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, आनंदवन येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पोळ, मनसेचे नेते रमेश राजुरकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष करण देवतळे, ज्येष्ठ शिवसैनिक खेमराज कुरेकर, दत्ता बोरेकर, माजी सभापती अश्लेषा जीवतोडे, डॉ. प्रणिता मुनमाडे, डॉ. श्रुतिकर, आदी उपस्थित होते.

सदर शिबिराचा जवळपास एक हजार नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात तपासणी केलेल्या काही रुग्णांची आवश्यकतेनुसार सावंगी मेघे येथील रुग्णालयात अगदी स्वस्त दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच शिबिरात रोग निदान झालेल्या रुग्णांना स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर द्वारा संपूर्ण मदत केल्या जाणार आहे. शिबिराचा प्रारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाला. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली.

सर्वांनी ह्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान जिजामाता नर्सिग कॉलेज भद्रावतीच्या १७ विद्यार्थीनीचे विदेही सदगुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमाअंतर्गत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट व ग्रामिण रूग्णालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त भद्रावती तालुक्यातील वायगांव, चालबर्डी, पिर्ली, काटवल तुकुम, मुधोली, मनगाव थोराणा, हनुमान नगर भद्रावती या गावामध्ये आयोजित “एच.आय.व्ही / एड्स माहिती व जनजागृती” शिबीरात सहभागी होवून पथनाट्याव्दारे जनजागृतीचे उत्कृष्ठ कार्य केले, त्याबद्दल मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

सोबतच श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत दुर्धर आजाराने पिडीत असलेल्या स्थानिक टिळक वार्ड येथील उर्मीला लक्ष्मण बावणे व भद्रावती तालुक्यातील कोंढाळी येथील अजय प्रकाश कुटेमाटे यांना आर्थीक मदत (चेक वितरण) करण्यात आली. श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत यापूर्वी खांबाळा, कोंढा, पीपरी येथे आयोजित शिबीरामध्ये तपासणी झालेल्या रूग्णाची आचार्य विनोबा भावे ग्रामिण रूग्णालय, सावंगी मेघे, वर्धा येथे पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली.

यामध्ये उपचार करण्यात आलेले रुग्ण शिवण नक्षिने, शिल्पा भोस्कर, पांडुरंग येरमे, महेंद्र भोंगळे, प्रणाली कुत्तरमारे यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर व्दारे करण्यात आला.तथा सुरेश काळे, सुनील कोकाटे, पांडुरंग सुर, भास्कर चामाटे, प्रशांत बारेकर या दिव्यांगाना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.

यात आयुष्मान योजनेचे कार्ड मोफत जनरेट करून देण्यात आले. या उपक्रमाचा ९० नागरिकांनी म्हणजे ४० कुटुंबांनी लाभ घेतला.सदर शिबिराच्या यशस्वीतेकरीता ट्रस्टचे कार्यवाह प्रा. धनराज आस्वले, दत्ता बोरेकर, खेमराज कुरेकर, जयंत टमुर्डे, डॉ. नरेंद्र दाते, विठ्ठल टाले, सचिन चुटे, राहुल बलकी, जग्गू गोचे, मुन्ना शेख, आशीष घुमे, गणेश तोडासे, सुनील जवंदड, शेखर पिंपळापुरे, संजय तोगट्टीवार आदींनी परिश्रम घेतले.

तर स्थानिक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, गांधी उद्यान योग मंडळ, रोटरी क्लब, संस्कार भारती, जयहिंद फाउंडेशन, स्फुर्ती स्पोर्टींग क्लब, संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना, स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशिय संस्था वरोरा , २४ तास सेवा ग्रुप, सेवा ग्रुप फाऊंडेशन, छावा ग्रुप, प्रहार वाहन चालक मालक संघटना, मित्र सेवा ग्रुप, पूर्णनियूक्त माजी सैनिक संघटना, टायगर ग्रुप, रोशनी स्वयंसहायता महिला बचत गट, एकार्जुना गृहीणी महिला बचत गट, कॉलरी वार्ड, श्री. संत गाडगेबाबा महिला बचत गट, एकार्जुना, श्री. डेबुजी महिला बचत गट, कॉलरी वार्ड, भारत महिला बचत गट जिजामाता वार्ड, हर्षदा महिला बचत गट, कॉलरी वार्ड, तथा इतर अनेक सामाजीक संस्थांनी सहभाग नोंदविला.उद्घाटन सोहळ्याचे संचालन राजेंद्र मर्दाने व आभार मंगेश भोयर यांनी केले.