घोडपेठ जवळ अपघातमध्ये २ अभियांत्रिकी तरूणांचा जागीच मृत्यु  2 engineering youths died on the spot in an accident near Ghodpeth

110

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.22 जुलै) :- तालुक्यातील चंद्रपूर नागपूर महामार्गावर असलेल्या घोडपेठ जवळ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकी स्वार असलेल्या दोन तरुणांनी आपला जीव गमावल्याची घटना घडलेली आहे. दोघेही विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

यश दिनकर देवाळकर (१९) रा. कवठाळा, ता. कोरपना व करण सुधाकर जुलमे (१९) रा. म्हातारदेवी (घुग्घुस) ता. चंद्रपूर अशी मृतक विद्यार्थ्यांची नावे आहेत. मृतक दुचाकीस्वार हे भद्रावती तालुक्यातील लोणारा येथे असलेल्या साई इंजिनिअरिंग कॉलेज येथील बी टेक प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास दोघेही दुचाकी क्रमांक एमएच २९ बीएन २२४२ ने कॉलेजला जात होते.

यावेळी उर्जाग्राम व घोडपेठ दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंप नजीक असतांना त्याच रस्त्यावरून पेट्रोल भरण्याकरिता पंपाच्या दिशेने रिव्हर्स येत असलेल्या टाटा झेस्ट क्रमांक एमएच ३४ एएम ६३९० या वाहनाला दुचाकीने धडक दिली. यात दोनही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिस करीत आहेत.