🔸बँकेचे संचालक रविंद्र शिंदे यांची उपस्थिती व हस्ते कर्ज वाटप(Bank Director Ravindra Shinde presence and loan distribution)
✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती (दि.18 मे ) :- स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या माध्यमातून भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्था र.नं. ८५७ मार्फत ८४२ सभासदांना ८,९९,७१,०००/- (आठ कोटी नव्यान्व लाख एकाहत्तर हजार) रूपये पिककर्ज बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक व कर्ज समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले.
याप्रसंगी बँक शाखा व्यवस्थापक वडगावकर,भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे, उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, शाखा निरीक्षक राजू बारहाते, डॉ. नरेंद्र दाते, प्रशांत कारेकर, संस्था सचिव सुधीर पिदुरकर आणि ठाकरे उपस्थित होते.
स्थानिक बँक शाखेशी संलग्न सात संस्थांमार्फत एकूण १७०३ सभासदांना १८,८४,४३,३००/- (अठरा कोटी चौऱ्यांशी लाख त्रेचाळीस हजार तिनशे) रुपयाचे पिककर्ज वितरीत करण्यात आले.
यामध्ये भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या ८४२ सभासदांना ८,९९,७१,०००/- रुपये, जेना सेवा सहकारी संस्थेच्या १५९ सभासदांना १,८२,९५,०००/- रुपये, मोहबाळा सेवा सहकारी संस्थेच्या २७ सभासदांना २८,४५,६००/- रुपये, टाकळी सेवा सहकारी संस्थेच्या २२९ सभासदांना २,३३,७५,५००/- रुपये.
मांगली ( रै. ) सेवा सहकारी संस्थेच्या १२४ सभासदांना १,६२,७७,०००/- रुपये, पिपरी सेवा सहकारी संस्थेच्या १३० सभासदांना १,४१,११,५००/- रुपये आणि घोनाड सेवा सहकारी संस्थेच्या १९२ सभासदांना २,३५,६७,७००/- रूपये पिक कर्ज वितरीत करण्यात आले.
