आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या कडून घोडझरी तलावात बुडालेल्या युवकांच्या कुटुंबीयाचे सांत्वन व आर्थिक मदत From MLA Smt Pratibhatai Dhanorkar Consolation and financial help to the family of youth who drowned in Ghodzari lake

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.22 जुलै) :- स्थानिक शेगाव येथील युवक दिनांक 16 तारीख रविवारला एन्जॉय म्हणून मोज मस्ती करण्या करिता आपल्या संपूर्ण मित्रासह घोडझरी तलाव पर्यटन स्थळ पाहण्या करिता गेले होते.

परंतु येथील चार युवकावर काळाचा घात झाल्याने मोज मस्ती करीत दरम्यान एका युवकाचा पाय घसरून पाण्यात पडला त्याला वाचाविण्याकरिता दुसऱ्याने हात समोर केला.

तोही गेला अश्या प्रकारे स्थानिक शेगाव येथील चेतन भीमराव मांदाडे वय 17 वर्ष, धीरज गजानन झाडे 27 वर्ष , मनीष भरत श्रीरामे वय 30 वर्ष व संकेत प्रशांत मोडक या चार ही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याने यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून काही कुटुंबाची छत्रछाया उडाली .

तर काहींचा आधार तर काहीचा म्हातारपणीचा आधार गेला असल्याने या पीडित कुटुंबीयांना मायेचा आधार म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची सखोल चौकशी विचारपूस करून प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे संत्वान करून आर्थिक मदत आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी केली .

तसेच कुटुंबाची आर्थिक अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून काही निधी प्राप्त होते का. यावर सर्व अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा केली व त्यांना अपघाती विमा अन्य शासकीय योजनेचा लाभ मिळवून देईल असे त्यांच्या कुटुंबीयांना सांगून त्यांचे सांत्वन केले व मी सदैव तुमच्या पाठीशी आहे काही अडी अडचणी असल्यास मला कळवा असे देखील आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी पीडित कुटुंबियांसमोर व्यक्त केले ..

पीडित कुटुंबीयांचे सांत्वन व आर्थिक मदत करते वेळी काँग्रेस पक्षचे कार्यकर्ते श्री राजुभाऊ चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा , श्री मिलिंद भोयर , निलेश भालेराव , योगेश खामनकर, हरीश जाधव , यशवंत लोडे , प्रभाकर घोडमारे , दिवाकर मेश्राम , दिवाकर निखाडे, शंकर घोडमारे , प्रफुल वाढई ग्राम पंचायत सदस्य शेगाव व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.