ट्रांसफार्मर ना दुरुस्तीने गुडगाव – वडेगाव चा पाणीपुरवठा ठप्प

🔸ट्रांसफार्मर नवीन बसवण्याची सुधीर मुडेवार यांची मागणी 

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.19 ऑक्टोबर) :- तालुक्यातील गुडगाव – वडेगाव येथील ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी जवळ विद्युत ट्रांसफार्मर जळाल्याने दोन्ही गावाचा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून ठप्प झाला आहे त्याकरता विहिरीजवळील ट्रांसफार्मर नवीन बसविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांनी अभियंता महावितरण कंपनीला केले आहे.

 गुडगाव वडेगाव या गावात पंचवीस वर्षापासून ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअतर्गत गावातील प्रत्येक घरांना नियमित पाणीपुरवठा केल्या जातो मात्र गेल्या दोन महिन्यापासून येथील ट्रांसफार्मर जळाल्याने संपूर्ण गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांनी ट्रांसफार्मर नवीन बसविण्याकरिता लेखी व तोंडी सूचना केल्या मात्र याकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने येथील ट्रान्सफर लवकरात लवकर बसविण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी महावितरण कंपनीला दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार, वंदना दातारकर, उपसरपंच जयदीप खोब्रागडे, शैलेश चौधरी, नंन्नावरे सह आधी गावकरी उपस्थित होते.