पूरग्रस्त शेतकऱ्यांना 25000 एकरी राशी अनुदान द्या..संजय बोधे Give subsidy of 25000 acres to flood affected farmers..Sanjay Bodhe

90

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.22 जुलै) :- दिनांक 18 , 19 जुलै 2023 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत या नुकसानीमध्ये सोयाबीन कापूस धान इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात नासदूस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

आज पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून सर्व पिक पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पुरामध्ये शेतीचे नुकसान झाले .

त्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डीआरएसपी चे चंद्रपूर जिल्ह्याची प्रभारी तथा विदर्भसचिव संजय बोधे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहेत ज्यांच्या शेतमालांची अति नुकसानीमुळे नुकसान शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहेत.