कराटे म्हणजे मारामारी नव्हे ,तर आत्मसुरक्षा Karate is not fighting, but self-defense

🔸’ती ‘ ने आत्मसुरक्षेकरिता स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्यावे .. कराटे प्रशिक्षक कुणाल दुर्गे( ‘She’ should take axiomatic training for self-defense…Karate instructor Kunal Durge)

✒️वर्धा (wardha विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वर्धा (दि.9 जून) :- आधुनिक युगात समाजात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तेव्हा तरुणींनी व महिलांनी स्वरक्षणासाठी सज्ज असणे काळाची गरज आहे. म्हणून ‘ती ‘ ने स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्यावे.

कराटे म्हणजे मारामारी नसून विना हत्यार आत्मसुरक्षा करणे आहे असे प्रतिपादन कारंजा येथील सूर्योदय कराटे क्लबचे सर्वेसर्वा तथा कराटे प्रशिक्षक कुणाल दुर्गे (ब्लॅक बेल्ट सेकंड डिग्री) यांनी कारंजा येथील मॉडेल हायस्कूल येथे आयोजित स्वयंसिध्द प्रशिक्षण दरम्यान केले.

उदघाटन कार्यक्रमाला कराटे प्रशिक्षक मुकेश ठाकरे,अंकित शेंडे,राजेश निस्ताने,प्रफुल आत्राम उपस्थित होते.विद्यार्थ्यांना आत्मसुरक्षेचे धडे मिळावे म्हणून स्वयंसिध्द प्रशिक्षण चे आयोजन केले आहे.

समाजात वावरताना समाज विघातक प्रवूर्तीकडून तरुणींना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर ती अबला नसून सबला आहे हे सिद्ध करण्याकरिता कराटे शिकावे असे मत सामाजिक कार्यकर्ते अंकित शेंडे यांनी व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला सूर्योदय कराटे क्लबचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंगेश गाडरे,संदीप काशीकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिक्षम घेतले.