शेगाव परिसरात जनावरांवर पुन्हा लंपी रोगाचे सावट Lumpy disease outbreak again in Shegaon area

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू .(Shegaon BK प्रतिनिधी) 

शेगाव बू (दि.10 जून) :- स्थानिक शेगाव बू तसेच येथील परिसरातील अर्जुनी , चारगाव, वायगाव , दादापुर , बेंबळा , इत्यादी गावात लंपि आजाराने डोके वर काढले असून अनेक जनावर आजारी पडले आहेत. तेव्हा या परिसरात या रोगाचा अधिक थैमान होऊ नये या करिता शेगाव परिसरातील गावामधे जनावरांचे आरोग्य शिबीर घेणे गरजेचे आहे ..

विशेष म्हणजे शेतकरी आपल्या शेती मशागतीत गुंतला असून कर्ज बाजारी होऊन शेतीसाठी बी बियाणे खते घेण्यात मग्न झाला आहे . शिवाय यात जनावरांवर आलेले हे फार मोठे संकट शेतकरयांना सोषेनाशे झाले आहे . तेव्हा शेतकऱ्यांचा मुख्य पाया त्यांचे बैल जनावरे असते तेव्हा या रोग राई मध्ये जर त्यांचे जनावरे बैल दगावले तर शेतकऱ्यावर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळू शकते . तसेच ऐन शेती मशागात पेरणी हंगामात जनावर आजारी पडले असल्याने चिंता ग्रस्त झाला असल्याचे दिसून येत आहे . 

     तेव्हा या महाभयानक रोगतून मुक्त करण्या करीत प्रत्येक गावात जनावर इलाज उपचार शिबीर घेण्यात यावे तसेच प्रत्येक जनावरावर लम्पी रोगाचे लसीकरण मोहीम तात्काळ राबविण्यात यावी अशी मागणी श्री अभिजीत पावडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वरोरा तसेच आदिवासी विवीध कार्यकारी सोसायटी चे उपसभापती चारगाव बू. यांनी केली आहे .