सोयाबीन उत्पादन वाढीसाठी अष्टसूत्रीचा वापर करा. कृषी विभागामार्फत सावरी (बिड) येथे मागदर्शन Use Ashtasutri to increase soybean yield. Guidance at Savari (BID) through Agriculture Department

🔸मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री झाडे साहेब(Guidance Agriculture Assistant Mr. Zade Saheb)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.9 जून) :- खरीप पूर्व नियोजन सभा तसेच अष्टसूत्री पद्धतीचा वापर करून सोयाबीन खरीप पूर्व नियोजन सभा तसेच अष्टसूत्री पद्धतीचा वापर करून सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढवणे त्यामध्ये 

*घरगुती बियाण्याची प्रतवारी करणे*

बहुतेक शेतकरी सोयाबीनचे घरचे बियाणे पेरणी करीता वापरत असतांना प्रतवारी न करता वापरतात. त्यामुळे पेरणीसाठी सरसकट ३५ ते ४० किलो बियाणे वापरतात. सोयाबीन पीक स्वयंपरागसिंचीत असल्याने या पिकाचे सुधारीत वाणाचा वापर केला जातो. सर्वसाधारण ६७ टक्के बियाणे दरवर्षी घरगुती निवडपद्धतीने राखुन ठेवुन ती पेरणी केली जाते.

घरगुती राखुन ठेवलेले बियाणे वापर करतांना स्पायरल सेपरेटरमधून प्रतवारी करुन घ्यावी. प्रतवारी केलेले बियाण्याची घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास शिफारशीनुसार हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे, ७० टक्के पेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास प्रति १ टक्का उगवणीकरीता अर्धा किलो प्रमाणे बियाण्याची मात्रा वाढवावी. प्रतवारी करुनही उगवणक्षमता ६० टक्के पेक्षाकमी असल्यास असे सोयाबीन बियाणे पेरणीकरता वापरु नये.

*बियाणे उगवण शक्ती तपासणी करणे*वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण बियाणाचे प्रतिनिधीत्व करतील असे 100 दाणे घ्यावे व ते ओल्या गोणपाट, टिशुपेपर, वर्तमान पत्र कागद, जर्मिनेटींग पेपर, ट्रे व मातीमध्ये या कोणत्याही पद्धतीने बियाणे ओळीत ठेवा, ते गुंडाळा आणि 4 ते 5 दिवस सावलीत ठेवावे. पाच दिवसानंतर अंकुरित बियाणे मोजा आणि अंकुरित बियांची टक्केवारी काढणे.

*बीजप्रक्रिया करणे*

बीज प्रक्रिया करुन पेरणी केल्यामुळे रोपांची उगवण चांगली होते. रोपाची जोमदार वाढ होते व सुरुवातीच्या काळात कीड व रोगापासून पिकाचे संरक्षण होते. तसेच जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे व्दिदल पिकांचे मुळावरील गाठीमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण होते. तसेच पिकास मुळाव्दारे घेण्याच्या स्थितीत स्फुरद उपलब्ध करुन देते.

*बियाण्याची / वाणाची निवड करणे*

शक्यतो दहा वर्षाच्या आतील वाणाची निवड करावी. (जेएस-२०२९ (२०१४), एमएयुएस- १५८(२०१०), एएमएस -१००१(२०१८), एएमएस-एमबी-५-१८ (२०१९), एमएयुएस-१६२ (२०१४), जेएस-२०३४ (२०१४), जेएस – २०९८ (२०१९), एमएसीएस -११८८ (२०१३), एनआरसी -८६ (२०१५), एमएयुएस – ६१२ (२०१६) फुले अग्रणी (केडीएस -३४४) (२०१३), फुले संगम (केडीएस-७२६) (२०१६), फुले किमया(केडीएस-७५३) (२०१७), एएमएस-१००-३९(२०१९), केडीएस-९९२(२०२०)

*पेरणी पद्धत*सलग दोन ते तीन दिवसात ७५ ते १०० मिमी पाऊस अथवा चार ते सहा इंच जमीनीत ओल उपलब्ध झाल्यानंतर व वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी. 

*पेरणीची खोली*

रब्बीमध्ये पेरणी करण्याकरीता बियाणे खोल ओलीत पडावे म्हणून पेरणी यंत्राच्या नळ्या उलट्या म्हणजेच खताची नळी बियाण्याला व बियाण्याची खताला जोडतात. खरीपाची पेरणी करण्यापुर्वी पेरणी यंत्राच्या नळ्या योग्य प्रकारे जोडणी करुन घ्यावे. पेरणी यंत्राचे फण सारखे खोलीवर लागावे, याकरीता समपातळीत करुन घ्यावे.

पेरणी करीत असतांना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. रासायनिक खत खालच्या बाजुला व त्यावर ५ सेमी अंतरावर बियाणे पेरणी होत असल्याची खात्री करावी. ट्रॅक्टरव्दारे पेरणी करतांना ट्रॅक्टर सेंकड लो गेअरमध्ये १.९६० आर.पी.एम. ठेऊन प्रति तास ५ किमी या वेगाने चालविल्यास साधारण ४५ ते ५२ मिनीटात एक एकर पेरणी करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करुन नये. शक्यतोवर बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करावी. साध्या पेरणी यंत्राने पेरणी करतांना प्रत्येक सात तासानंतर ६० सेमी रुंदीची खोल

*रासायनिक खताची योग्य मात्रा*

१). युरिया १६ किलो +१०:२६:२६ -४६ किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो.

२). युरिया ६.५२ + १२:३२:१६ -७५ किलो + गंधक २० किलो.

३). युरिया २६ किलो + सिंगल सुपर फॉस्पेट १५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २० किलो.

४). युरिया ५.७३ किलो + डी. ए. पी. ५२.१६ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २० किलो + गंधक २० किलो.

५). १५:१५:१५-८० किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो.

६). १८:१८:१० – ६६.४० किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ८.९३ किलो.वरील पैकी एक खत + गंधक एकरी ८ किलो पेरणी करताना द्यावी. पेरणीनंतर सोयाबीन पिकास युरिया खताची दुसरी मात्रा देण्यात येऊ नये. काही भागात सोयाबीन पिकाची वाढ व्हावी म्हणून पेरणीपासून एक महिन्यानंतर युरिया खताचा वापर करतात. त्यामुळे पिकाची कायिक वाढ होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे पेरणीनंतर युरिया खताचा वापर टाळावा. रासायनिक खताबरोबर एकरी ४ किलो फोरेट किंवा १० किलो कॉर्बो फ्युरॉन दिल्यास सोयाबीनवरील महत्वाच्या किडी खोडमाशी व चक्रीभुंग्याचे व्यवस्थापन करण्यात मदत होते.

*तणनाशकाचा वापर*

जमीनीची सेंद्रीय कर्ब व प्रति ग्रॅम जिवाणुची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळून भौतिक पद्धतीने तण नियंत्रण करावे. अपवादात्मक परिस्थितीतच तणनाशकाचा वापर करावा. पेरणी लगेचच फ्लुमीऑक्झीन ५० टक्के एस.सी. ५ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. किंवा पेरणीनंतर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान तण दोन ते तिन पानावर असतांना इमॅझीथायपर २० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा क्विझॅलो्रपॉप पी इथाईल ५ टक्के इ.सी. २० मीली प्रती १० लिटर पाणी.

यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी नॅपसॅक पंपाव्दारेच करावी. तणनाशकाच्या फवारणी करीता गढुळ पाण्याचा वापर करु नये. तणनाशकाची फवारणी करतांना वापरण्यात येणारे पाणी आम्लधर्मी असावे. त्याकरिता लिटमस पेपरव्दारे तपासणी करावी. पाणी अल्कधर्मी असल्यास सिट्रीक ॲसिड मिसळुन पाणी आम्लधर्मी करुन वापरल्यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. फवारणीकरीत असतांना जमीनीत पुरसा ओलावा असणे आवश्यक आहे.

या अष्ट सूत्राचा वापर करून सोयाबीनची उत्पादकता वाढ करणे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री मापारी यांनी केले तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग , महाडीबीटी , फळबाग लागवड बद्दल व कृषी विभागाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री झाडे साहेब यांनी केले सदर सभेला गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रगतशील शेतकरी शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते