चंदनखेडा येथील विकास गायकवाड या सर्प मित्रांनी दिलं अजगर ला जीवदान

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.18 जानेवारी) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शेतकरी पंढरी विठ्ठल हनवते.यांच्या शेतात आज १८ जानेवारी २०२४ ला. हनवते यांच्या शेतात अजगर प्रजातीचा साप आढळून आला .

शेतकरी पंढरी विठ्ठल हनवते यांनी चंदनखेडा येथील सर्प मित्र विकास गायकवाड यांना दिली.माहीती मिळतात तात्काळ सर्प मित्र विकास गायकवाड यांनी शेतकरी पंढरी विठ्ठल हनवते यांच्या शेतात जाऊन भला मोठा अजगर १० फूट लांबी व ११ किलो वजन असलेल्या प्रजातीचा अजगर सापाला पकडले .

त्यानंतर चंदनखेडा येथील विकास गायकवाड सर्प मित्रांनी भद्रावती येथील वनविभाग मध्ये जावून नोंदणी केली व परवानगी घेऊन अजगर सापाला आयुध निर्माणी येथील जंगल परिसरात सोडून जिवदान दिले .