शेती ओलितासाठी 24 तास विद्युत पुरवठा द्या…. ईश्वर नरड यांची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.31 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव येथील युवा भाजपा चे कार्यकर्ते तसेच विद्युत वितरण नियंत्रण समिती अशासकीय सदस्य कृषिग्रहक श्री ईश्वर नरड यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शेती ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा या करिता मान.श्री . सुधिरभाऊ मुनगंटीवार पालक मंत्री चंद्रपूर यांना निवेदनातून मागणी केली आहे .

         एकीकडे मोझाक या व्हायरसमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले तर दुसरीकडे शेतकऱ्याला थ्री फेज वीजपुरवठा दिवसा नसल्याने शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे कपाशीचे पीक देखील उन्हामुळे मरणागती जात असल्याचे दिसत आहे याच सोबत धान पीक देखील पाण्या अभावी नष्ट होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

त्याकरिता रब्बी हंगामातील चना गहू या पिकांना पाणी सुधा गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना रात्रौला आपल्या पिकाला पाणी करावे लागत असते तेव्हा येथील शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असून यात रात्री ला रानटी जनावरे , विषारी साप विंचू अश्या प्राण घ्याल प्राण्याला तोंड देत जीव मुठीत धरून पानी करावे लागत आहे . करिता शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या सोई करिता 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत देण्यात यावा अशी मागणी सर्व शेतकरी तसेच युवा शेतकरी ईश्वर नरड यांनी केली आहे.