कविता अवकाळी पाऊसाचे वर्णन           Poetry Description of unseasonal rain

172

✒️गजानन लांडगे महागाव (यवतमाळ प्रतिनिधी)

महागाव (दि.29 एप्रिल) :- 

                   कवी..

            अभिजीत मडावी

 

अवकाळी पावसानं कशी केली बघा दैना

काय होईल पिकाचं डोळा डोळ्याला लागना

पाणी ढगातून नाही माझ्या डोळ्यातून वाहे

थाटामाटात लगीन लेकीचं हो आता राहे

 

माझ्या लेकीचं सासर मोठं तोलाचंमोलाचं

नाही कशाची ददात घरदार ते मानाचं

हौस जावयाची माझ्या पूर्ण करायची आशा

अवकाळी पावसाने केली पुरती निराशा

 

झाले नुकसान फार गेली वाहून कमाई

या वरशी वाटलं माझी हसेल काळी आई

पिक जोमानं वाढलं सारं आवार फुललं

अवकाळी पावसानं माझं नशीबच नेलं

 

 

पर लेक माझी शानी म्हणे नका करू त्रागा

बाबा आमच्याकडं बघा अन धीरानं हो वागा

तुम्ही कुटुंबप्रमुख तुम्हीच आमचा आधार 

अवकाळी पावसानं करू नका आम्हां निराधार…… 

 

अभिजीत मडावी

कवी – कट्टा 

९६५७९३९१०५ / ९०२२८१११६४

https://smitdigitalmedia.com/