अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार 

🔹आरोपी गजाआड

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.11 मे) :- 

पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या आणि 3 किमी अंतरावर असलेल्या लाडबोरी येथे अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या गुन्ह्यातील आरोपीचे नाव साहिल सुनील नागदेवते वय 22 वर्ष असून आरोपीस अटक करण्यात आली आहे

थोडक्यात हकीकत अशी की अत्याचार ग्रस्त मुलगी ही त्याच गावातील असून आरोपी साहिल हा देखील तिथलाच रहिवाशी आहे आरोपीस मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

फिर्यादी चे तक्रारीवरून पो. स्टे सिंदेवाही येथे अप न. 235/2024 कलम 376(2)(एन)भा द वि कलम4,6 बाल लै अ सं,अधी 2012 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.असून सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार श्री. तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली API स्थूल साहेब . पुढील तपास करीत आहेत.