वाघाच्या हल्यात इसम ठार Isam was killed by a tiger

298

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.28 एप्रिल) :- 

          मुल मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या लोहराच्या जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम बोपचे (purushottm bopche)(४०) हा इसम ठार झाला.

ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. इंदिरा नगर येथील रहिवासी असलेला पुरुषोत्तम स्थानिक एम ई एल पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. 

सकाळी पुरुषोत्तम वन फुले वेचण्यासाठी लोहारा जंगलात गेला होता. दुपार झाली तरी घरी परत आला नाही म्हणून पत्नीने घरा शेजारी असलेल्या पतीच्या मित्रासोबत शोध घेतला. यावेळी जंगलात येऊन बघितले असता त्याचा मृतदेह मिळाला.

https://smitdigitalmedia.com/