रस्त्यातील खड्ड्यांचे केले नामकरण सोहळा   Naming ceremony of road potholes

🔹रस्त्यातील खड्डा मध्ये अभिनव आंदोलन(Innovative movement in the pothole)

🔸नामकरण सोहळा असे फलक पकडून रस्त्यातील खड्ड्यांचे केले “विकास” असे नामकरण(Naming ceremony holding placards and naming potholes as “Vikas”)

🔹15 दिवसात रस्त्याचे काम सुरू केले नाही तर वरोरा येथे घेराव घालू …अभिजित प्रभाकरराव कुडे(If the road work is not started in 15 days, we will lay siege at Varora…Abhijit Prabhakarrao Kude)

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.29 जून) :- तालुक्यातील उखर्डा गावातील नागरिकांनी केले रस्त्यातील खड्ड्यात नामकरण सोहळा. “विकास ” असे केले खड्ड्यांचे नामकरण. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी साठी निवेदन, आंदोलन सुरू आहे.

रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते हे देखील समजत नाही आहे. संपूर्ण रस्ता मध्ये खड्डे पडले आहेत. लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा गेल्या 2 वर्षापासुन सतत निवेदन आंदोलन सुरू आहे. रस्त्यातील खड्डय़ात भजन आंदोलन, बेशरम चि झाडे लावून निषेध व्यक्त केला.

रस्त्यातील खड्डय़ात झोपा काढा आंदोलन, दिवाळीत दिवे लावले असे कित्येक आंदोलन करण्यात आले, रस्त्याची दुर्दशा झाली आहे तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आली नाही, पावसाळा सुरू झाला आहे रस्त्यातील खड्डय़ात पाणी साचले आहे त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही . सतत अपघात घडत आहेत. दिवसा सुद्धा गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रात्रीच्या वेळी तर या रस्त्याने गाडी चालविणे अशक्यच . रस्त्यावरील पुलाच्या वर भगदाड पडले आहेत ,साधी मोटारसायकल ने प्रवास करणे अवघड झाले आहे. इतकी दुर्दशा झाली तरी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी झोपा काढत आहे, रस्त्याचे काम 15 दिवसात सुरू करा अन्यथा वरोरा येथे घेराव घालू असा तीव्र इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे.

रस्त्याच्या मागणीसाठी सतत अभिजित कुडे निवेदन, आंदोलन करत आहेत, एक नाही तर संपूर्ण तालुक्यातील रस्त्याची हीच परिस्तिथी आहेत. आता निवेदन आंदोलन खूप झाले आता प्रशासनाला धारेवर धरत घेराव घालू , रस्त्याने प्रवास करताना कुणाला जिवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार, उखर्डा ग्रामस्थांनी रस्त्याचे नामकरण करून “विकास ” असे नाव ठेवले.

यावेळी अभिजित कुडे, वैभव पुसदेकर, मनोज कुडे,कमलाकर कुडे, चैतन्य पुसदेकर, ओम राऊत, बबलू धोटे, शुभम उरकुडे,अशोक वावरे, शिवम येलेकर, अशोक तेलंग,राजकुमार नगराळे, गजानन देवतळे, व महिला उपस्थित होत्या.