
✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.29 एप्रिल) : – शहरातील शिवाजीनगर येथील एका आरोपीसह तीन आरोपीनी वेगवेगळ्या ठिकाणाहून हांडेल लॉक नसलेल्या चार मोटरसायकल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी गाड्या विकण्याच्या दृष्टीने गाड्यांचे स्पेअर पार्ट व इंजिन काढून ग्राइंडर ने त्या इंजिनिवरील क्रमांक घासून लोखंडी स्पंचींग च्या साह्याने स्पंज करून विकले. या घटनेतील चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील शिवाजीनगर निवासी कुणाल हरिदास उईके वय 21 वर्षे, विंजासन निवासी यश संजय कामतवार वय19, बंगाली कॅम्प निवासी राहुल बावणे 21, विजासन निवासी प्रवीण बंडू मांढरे वय 23, असे आरोपिंची नावे असून पोलिसांनी मुद्देमालासह त्यांना अटक केली आहे.
सदर आरोपींनी चोरी केलेली वाहने विक्री करता यावी यासाठी त्यांनी केटीएम ड्यूक, मोटरसायकल व स्प्लेंडर मोटरसायकल यांचे स्पेअर पार्ट वेगळे करून काही गाड्यांचे इंजिन क्रमांक व चेसेस क्रमांक ग्राइंडर ने खोडून त्यावर लोखंडी पंचिंग शिक्क्यांनी दुसरे इंजिन क्रमांक व चेसेस क्रमांक बदलण्याचे दिसून आले.
ग्राइंडर मशीन व लोखंडी पंचिंग शिक्के जप्त करण्यात आले आहेत. ही माहिती पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मिळाली होती. या गुन्ह्याची कबुली चारही आरोपींनी दिली असून त्यांना न्यायालयात हजार केले असता चार दिवसांना चार दिवसांसाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष्य नोपानी, पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, विशाल मुळे, पोलीस अमलदार, अनुप आष्टूनकर, विश्वनाथ चुदरी, जगदीश झाडे यांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत
