विष प्राशन करून सोळा वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या घोडपेठ येथील घटना Incident of 16-year-old student’s suicide in Ghodpet after consuming poison

✒️ बाळू रामटेके घोडपेठ (Ghodpeth प्रतिनिधी)

घोडपेठ (दि.11 जुलै) :- विष प्राशन करून एका सोळा वर्षिय विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 11 रोज सोमवारला रात्रो मध्यरात्रीनंतर भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली.

साहिल सुनील ठक वय सोळा वर्षे असे या मृतकाचे नाव असून तो शहरातील निर्माणी वसाहतीतील केंद्रीय विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी होता. मृत्यूचे कारण मात्र कळू शकले नाही. मृतक साहिल हा मूळचा कोलगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी होता.तो घोडपेठ येथील आपल्या आजोळी राहून शिक्षण घेत होता.

साहिल याने घटनेच्या मध्यरात्री विष प्राशन केले व स्लॅब वर गेला तेथेच त्याचा मृत्यू झाला. सदर घटना सकाळी उजेडात आली. तो स्लॅबवर मृतावस्थेत आढळून आला.आपल्या आत्महत्येस कोणिही जबाबदार नसल्याचे त्याने आपल्या सुसाईट नोटमधे लिहले असल्याचे पोलिसांनी सांगीतले.भद्रावती पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असुन घटनेचा पुढील तपास ते करीत आहे.