सावकारी कर्जप्रकरणी शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न Attempted suicide by consuming poison of a farmer in moneylending loan case

415

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.8 जून) :- जबरदस्तीने सावकार वडिलोपार्जित शेतावर कब्जा करण्याचे प्रयत्न करीत असून त्यामुळे सदर शेतकऱ्याला पश्चाताप झाला आणि त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले परंतु रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.सावकारावर सावकारी कायद्याअंतर्गत कारवाई करून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्याचा मुलगा व वारसदार यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे.

वरोरा तालुक्यातील वंधली येथिल मारोती महादेव चौधरी यांचे शेत खडतांगडी रिठ सर्वे क्रमांक ८७/१/अ एकूण क्षेत्रफळ ५.१६ पैकी अनिता राजेंद्र सुराणा राहणार माढेळी यांनी एकूण क्षेत्रफळ ५.१६ पैकी २.०० हेक्टर आर सावकारी कर्जात २०१५ रोजी माझे वडीलाकडून कर्ज स्वरूपात सहा लाख देण्याचे कबूल केले व माझ्या वडिलाकडून परस्पर विक्री करून घेतली. या रकमेतून मोजणी फेरफार व व्याज इत्यादी रुपये एक लाख पन्नास हजार कापून मला चार लाख पन्नास हजार नगदी स्वरूपात दिले.

माझे वडील व मी,माझा भाऊ किरण चौधरी याने सावकार अनिता राजेंद्र सुराणा यांना सन २०१८ व सन २०१९ या दोन वर्षात रुपये चार लाख परत केले. तसेच सन २०२० या वर्षात एक लाख अंशी हजार व सन२०२१ रोजी एक लाख नव्वद हजार रुपये नगदी स्वरूपात असे एकूण सात लाख सत्तर हजार रुपये अनिता राजेंद्र सुराणा यांना परत केले. त्यानंतर मी व माझे वडील मारोती महादेव चौधरी यांनी वारंवार अनिता राजेंद्र सुराणा यांना आमचे शेत परत करण्याकरता मागणी केली असता अनिता राजेंद्र सुराणा व त्याचे पती राजेंद्र सुराणा व सावकारी कर्जातील मध्यस्थी बाळू उर्फ पुरुषोत्तम भोयर यांना वारंवार विनंती केली.

तेव्हा त्यांनी पुन्हा रुपये बारा लाख ची मागणी केली व शेतावर बळजबरीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आमचे कुणीच काही बिघडवू शकत नाही असे म्हणून आमच्या घरी येऊन आमच्या संपूर्ण कुटुंबाला धमकी दिली की तुम्ही शेतात येऊन बघा आम्ही प्रत्येकाला बघून घेऊ असे अनिता राजेंद्र सुराणा यांचे पती राजेंद्र सुराणा व सावकारी कर्जातील मध्यस्थी बाळू उर्फ पुरुषोत्तम भोयर यांनी म्हटले. असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मुलगा मनोहर मारोती चौधरी यांनी म्हटले आहे. यापूर्वी दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी अनिता राजेंद्र सुराणा यांनी मोजणी आली व जबरदस्तीने शेतावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळेस मोजणी वापस गेली त्यानंतर आज दिनांक ७/५/२०२३ रोजी पोलीस बंदोबस्तात पुन्हा मोजणी करून शेत तब्येत घेण्याचा प्रयत्न केला मी अर्जदार मनोहर मारुती चौधरी व इतर तीन बंधू व एक बहीण असे कायदेशीर वारसदार आहोत असेही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात मनोहर मारोती चौधरी यांनी म्हटले आहे.

त्यामुळे जबरदस्तीने सावकार अनिता राजेंद्र सुरांना व त्याचे पती राजेंद्र सुराणा आमचे वडीलोपार्जीत शेतावर जबरदस्तीने कब्जा करण्याचे प्रयत्न करीत असून आजचे प्रकरण बघून माझ्या वडिलांना पश्चाताप झाला. व त्यांनी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या सावकाराला सावकारी कायदे अंतर्गत कारवाई करून आम्हाला न्याय देण्याची मागणी विष प्राशनग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मनोहर मारोती चौधरी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .