वाघाच्या हल्यात तुकुम (तिव्हला) येथिल इसम ठार Tukum (tivla)yethil isam was killed by a tiger                  

🔸नागभीड तालुक्यातील घटना,मोहफुल गोळा करने जीवावर बेतले                                    

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.5 मार्च) :- नागभीड तालुक्यात पासुन तिन कि.मी. अंतरावर असलेला तुकुम(तिव्हला) या गावातील इसमावर मंगळवारला सकाळी वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली.मोहफुल गोळा करणे जिवावर बेतले.मृतकांचे नाव अरुण महादेव रंधये (५५) असुन हा इसम पहाटे आपल्या पत्नी सोबत कक्ष क्रमांक ६० या वनात मोहफुल गोळा करायला गेला होता.

मृतक अरुण हा एका झाडाचे व त्याची पत्नी थोड्या दुर अंतरावर दुसऱ्या झाडाचे मोहफुल गोळा करीत होती. मोहफुल गोळा झाल्यावर तिने आपल्या पतीला आवाज दिला.नंतर त्यांची शोधा-शोध केली पण तो सापडला नाही.पत्नी सरळ गावात आली व याची दिली.गावकरी यांनी शोधले असता अरुणचा वनात मृतदेह आढळुन आला.या घटनेची माहीती लगेच नागभीड वनविभागाला देण्यात आली.

कार्यालयाचे कर्मचारी घटना स्थळावर दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी नागभीड च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.मृतकाला पत्नी,मुलगी आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तुकुम हे गाव अगदी घोडाझरी अभ्यारण्याला लागुन आहे.पंधरा दिवसा अगोदरच मोठा पट्टेदार वाघ घोडाझरीच्या प्रवेश द्वारा जवळ आला होता.