मराठी फिल्म पुरुषा मुळे अभिनेत्री प्राजक्ता शिंदे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घरा घरात पोहोचलं The name of actress prajakta shinde reached every household in Maharashtra due to the Marathi film “purusha

🔸अभिनेत्री प्राजक्ता शिंदे यांनी पत्रकारांना मुलाकात देताना, पुढे त्यांना बॉलिूड , तोलिवूड, हॉलीवूडमध्ये काम करायचं त्यांचं स्वप्न आहे

✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी )

   पुणे (दि.4 एप्रिल) :- माझी पहिली पुरुषा ही पाहिली फिल्म , दिपक कदम हे दिग्दर्शक होते.. पुरुषा फिल्म मधुन मला अंकुश चौधरी यांच्या हस्ते अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड मिळाले होते.१७ डिसेंबर २०२१ मध्ये माझी दुसरी मराठी मुवी ईमेल फिमैल रिलीज झाली होती.

योगेश जाधव यांनी दिग्दर्शन केले होते. दिपक कदम हे माझे मार्गदर्शक आहेत.ते मला वेळो वेळी मार्गदर्शन करत असतात. आता पर्यंत मी ५ मुव्हीज केले आहेत. त्याचबरोबर मी बरेच मुझीक केले आहेत.

प्यार होता जा रहा हैं, हातोंमे हात, तुझी नवरी. आणि माझी बुगांबो शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे. आतापर्यंत काही ठिकाणी वाईट तर काही ठिकाणी खुप छान अनुभव आला. एक चांगली अभीनेत्री व्हायचय खुप काम करायचंय. मी स्वतःला खुप मोठी अभिनेत्री झाली अशी अजिबात समजत नाही. चांगल्या कहाणी बरोबर काम आहे बस इतकचं.

 पुढे बॉलिूड , टोलीवुड हॉलिवूड मध्ये काम करायचच आहे हि माझं खुप मोठं स्वप्न आहे.या बाबतीत माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे..

     त्यांचे स्वप्न त्यांची इच्छा पूर्ण व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना.