?वेकोलि परिसरात राहत असलेल्या नागरिकांना हक्काची जागा द्या
?प्रहार सेवक शेरखान पठाण यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
✒️शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बू (दि.16 फेब्रुवारी) :-चंद्रपूर जिल्ह्यातील काळ्या कोळशाची खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजरी परिसरात गेल्या चाळीस पन्नास वर्षा पासून जवळपास साठ ते सत्तर कुटुंबे वेकीली परिसरात wcl च्या जागेवर वास्तव्यास आहे.
परंतु आता त्यांना ती जागा सोडा अशी नोटीस wcl प्रशासनाने बजावली आणी नागरिकामध्ये शासनाच्या या निर्णया मुळे शासनाविरुद्ध चिड निर्माण होऊन सर्व नागरिकांनी प्रहार सेवक शेरखान पठाण यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन दिले आणी चाळीस वर्षा पासून वातव्यास असलेल्या नागरिकांना wcl ने स्वमालकीची जागा द्यावी अन्यथा आम्ही आमचे घर पाडू देणार नाही अशी भूमिका घेऊ असे निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली.
आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्ही wcl खदान बंद पाडू आणी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसू असे निवेदना द्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन दिले आम्ही या वर संबंधीत अधिकाऱ्याची मिटिंग लावू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
