🔸विद्यार्थांनी आकलन व चिंतन करणे आवश्यक:- मा. नरेन्द्र कन्नाके
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.28 फेब्रुवारी) :- लॉर्ड बेडण पॉवेल यांच्या जयंती निमित्त नेहरू विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लकष्मीबाई व सावित्रीबाई फुले या स्काऊट गाईड पथका द्वारे ‘ चिंतन ‘ दिवस वेगवेगळ्या उपक्रम द्वारे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म.राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. मा. नरेन्द्र कन्नाके होते. प्रमुख पाहुणे श्री. कडूकर सर होते. कार्यक्रमाची सुरुवात लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. प्रास्ताविक गाईड कॅप्टन सौ. वरभे मॅडम यांनी पॉवेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
सौ. हिवरकर मॅडम यांनी स्काऊट गाईड विद्यार्थांनी कसे वागले पाहिजे यावर मार्गदर्शन केले.श्री उरकुडे सर यांनी स्काऊट गाईड चालवली बद्दल माहिती दिली.स्काऊट गाईड च्या नऊ नियम विषयी नऊ विद्यार्थांनी माहिती सांगितले. कु. सानिका तळवेकर, कु. तनिक्षा गारघाटे व सुष्मिता गुडधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. नरेन्द्र कन्नाके यांनी प्रत्येक विद्यार्थांनी आयुष्यात प्रगती साधायची असेल तर आकलन व चिंतन करणे आवश्यक आहे. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो. यासाठी प्रत्येक शिक्षकांनी सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. आवड व ध्येय याची सांगड घालून यशाचे उंच शिखर गाठता येऊ शकतात. असे बहुमूल्य विचार बिंबविने काळाजी गरज आहे.
खरी कमाई मध्ये जे विद्यार्थी विजेते झाले त्यांना प्रोत्साहन पर बक्षिस देण्यात आले. सूत्र संचालन कु. प्रार्थना पिसे तर आभार कु. प्रथम तलसे हिने मानले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. मा. ढाकुणकर सर, श्री. मत्ते सर सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
