रेल्वेखाली येऊन युवकाची आत्महत्या. भद्रावती येथील घटना Youth committed suicide by falling under the train. Incident at Bhadravati

45

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.25 मे):- भद्रावती येथील नेताजी नगर विजासन रहिवासी अविनाश मधुकर गराटे वय 29 वर्ष याने रेल्वेने कटून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 25 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. 

सविस्तर वृत्त असे आहे की, मृतक अविनाश हा ट्रॅक्टरवर ड्रायव्हरचे काम करायचा दिनांक 24 रोजी रात्री9.30 वाजताच्या दरम्यान घरून जेवण करून घराबाहेर पडला घरी आलाच नाही सदर घटना आज सकाळी उघडकीस आली असून त्याचा मृतदेह कुनाडा पुनर्वसित गावाजवळील रेल्वेच्या पोल क्रमांक 849 बी/6 डाऊन लेनवर आढळून आला.

सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणी करता पाठविण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास बुरांडे, प्रकाश कांबळे करीत असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

https://smitdigitalmedia.com/