आदर्श सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांचा पुरस्कार डॉ दीपक शिकारपूर यांच्या हस्ते देण्यात आला 

252

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे (pune प्रतिनिधी)

पुणे (दि.27फेब्रुवारी) :-रोटरी क्लब नारायणगाव हायवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या सौजन्याने राष्ट्रबांधणीचे शिल्पकार गौरव समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमांमध्ये आपल्या विभागातील समाजकार्यामध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना आमंत्रित केले होते.

तसेच नायगांव चे प्रथम नागरिक श्री जितेंद्र पांडुरंग चौधरी सरपंच यांना राष्ट्रबंधणीचे शिल्पकार हा पुरस्कार रोटरी क्लब मेंबर डॉक्टर दीपक शिकारपूर पी डी जी संगणक तज्ञ व लेखक यांच्या हस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन श्री रवींद्र वाजगे व श्री अंबादास वामन संचालक जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था तसेच नारायण आरोटे नंदकुमार चिंचकर श्रीकांत फुलसुंदर शिवाजी टाकळकर गणेश गोडसे रामभाऊ सातपुते यांनी आयोजन केले होते व याप्रसंगी उपस्थित माननीय श्री राजेंद्र चौधरी पोपट चौधरी उत्तम घुले ही व मान्यवर उपस्थित होते.