वरोरा उपजिल्हा रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती व सुरक्षित मातृत्व दिवस उत्साहात Warora upazila hospital celebrates Mahatma jotiba phule jayanti and safe motherhood day with excitement 

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 वरोरा (दि.12 एप्रिल) :- वरोरा व उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा जोतिबा फुले जयंती व सुरक्षित मातृत्व दिवस हे दोन कार्यक्रम घेण्यात आले.यासाठी मा श्री के.के.खोमने सहदिवाणी न्यायाधिश तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी, तसेच मा.देशपांडे सर अध्यक्ष तालुका अधिवक्ता संघ वरोरा ,मा डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक, मा.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका मा. श्री किरण घाटे विश्व जगतचे पत्रकार हे मंचावर उपस्थित होते .

सर्व मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रास्ताविक मा.डाॅ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांनी केले ‌त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आजच्या कार्यक्रमाची माहिती दिली पिसिपिएनडिटी संदर्भात माहिती दिली. तसेच मा.श्री खोमने सरदिवाणी न्यायाधिश यांनी आजच्या कार्यक्रमात कायदे,कानुन यांचे महत्त्व विषद केले.स्रीभ्रून हत्येवर मार्गदर्शन केले.

योगायोग हा कि ज्यांनी हा कार्यक्रम जागतिक स्तरावर केला आज कानुन कायद्याने त्याला मान्यता मिळाली म्हणून सरकार स्तरावर हा कार्यक्रम केला जातो त्यांची आज जयंती महात्मा जोतिबा फुले यांच्या जय़ंतिचा योग आला आणि हा दुग्धशर्करा योग्य घडुन आला.सूत्र संचालन श्री सतिस येडे आरोग्य सहाय्यक यांनी केले.

सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी आभारप्रदर्शन केले.आभारप्रदर्शनात सर्व मान्यवरांचे आभार मानले. सर्वांना महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व सुरक्षित मातृत्व दिवस किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले.या कार्यक्रमला सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच सर्व लाभार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमांचे आयोजन सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केले.सौ श्रीमती कापटे परीसेविका श्रिमती पुसनाके परीसेविका,सौ सूजाता जूनघरे सौ सोनल दांडगे अप.सौ किरण धांडे सौ रत्नमाला ढोले,सौ किरण वांढरे,सौ स्नेहा स्वप्नील वंजारे,सौ स्वाती यांनी मेहनत घेतली.आणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महीलांनी परीश्रम घेतलें.