वन जमीनीवरिल शेतीचा चा ताबा काढण्यासाठी एस डि ओ चे पारधी बांधवांना नोटीस 

🔸एसडिओ मॅडम आम्ही जगायचे कसे,आमचा शेतीवरच उदरनिर्वाह .आमची शेती हिसकावू नका 

🔹पारधी समाजाचे शासन प्रशासनाला विनंती 

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.4 मे) :- वरोरा येंन्सा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोंढाळा पारधी टोला येथील आदिवासी पारधी बांधव उदरनिर्वाहासाठी शासनाच्या पडीक जमिनीवरील झुडपी जंगल असलेल्या मौजा कोंढाळा येतील भूमापन क्रमांक 32 व 33 या जागेवर अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षापासून शेती करत आहे सन १९७८ ,१९८२,८३,ते १९८९-९० च्या सातबारा वर तशा नोंदी उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना जमिनिचे पट्टे देण्याची मागणी आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांनी केली.

अचानक कोंढाळा येथील पारधी बांधवांना उपविभागीय अधिकारी तथा वन जमाबंदी अधिकारी वरोरा यांचे नोटीस हाती येतात जणू पायाखालची वाळू सरकली जसे आभाळ कोसळले कोंढाळा येथे पारधी दहा कुटुंब गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून वास्तव्यास आहे समाजाचा मुख्य परंपरागत व्यवसाय शिकार करणे होता परंतु शासनाने बंदी घातल्याने जगायचे कसे असा यक्षप्रश्न उभा ठाकला जवळील पडिक झुडपी जंगल साफ करून त्यावर शेती योग्य जमिन तयार केली व शेती करणे सुरू केले आजतागायत त्या जमिनीवर पिके घेऊन उदरनिर्वाह सुरू आहे आदिवासी पारधी बांधवांनी तहसीलदारा पासून ते जिल्हाधिकारी आमदार खासदार मंत्री यांना कित्येक निवेदन दिली तरीही मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही.

पट्ट्यासाठी संघर्ष सुरूच आहे अचानक काल तहसील मधून वन जमाबंदी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे नोटीस हाती येतात जणू धक्काच लागल्याचे पारधी बांधव सांगतात इतकी वर्षे मुला बाळासारखी जमीन जोपासली ती आम्ही सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले उपविभागीय अधिकारी व वन अधिकारी हे चौकशी करिता आले असता पारधी बांधवांनी आम्ही अतिक्रमण जमीन सोडणार नसल्याचे त्यांना सांगितले आम्हाला पारंपारिक वन जमीन कायदा वन हक्क कायद्यानुसार जमिनीचे पट्टे द्या अन्यथा आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले .

आज दिनांक 3 तारखेला अतिक्रमणधारकांनी हक्क व दावे पुरावे त्यांनी तहसीलदार ,उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पुराव्यासह सादर केले व मालकी हक्कासाठी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे ,गजानन कारू पवार ,दिगंबर गुलाब पवार, शरद घोसरे, विनोद गुणवंत पवार ,ताराबाई पवार, यांची उपस्थिती होती.