स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन 

349

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव (दि. 22 फेब्रुवारी ):- तहसील कार्यालय महागाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्याच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहील.

महागाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा ताबडतोब द्यावा प्रोत्साहन पर अनुदान रक्कम त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावी तसेच विद्युत महामंडळाने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तोडलेल्या वीज कनेक्शन मुळे शेतकऱ्यांची पिके वाढत असून वीज कापणीची कारवाई त्वरित बंद करावी.

100% अनुदानावर कुसूम योजनेअंतर्गत सौर पंप देण्याची मागणी सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच मागेल तेथे पांदन रस्ता सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली तसेच कापूस सोयाबीन या पिकाच्या पडलेल्या भावासंदर्भात राज्य सरकारने केंद्रासोबत समन्वय साधून त्वरीत भाव वाढ करण्यात यावी यासह आनेक मागण्या करण्यात आल्या आहेत .यावेळी मनिष भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना .

महिला जिल्हा आध्यक्ष मेघाताई बोरूळकर युवा जिल्हा अध्यक्ष शिवानंद राठोड.जिल्हा संघटक सचिन उबाळे .युवा तालुका अध्यक्ष प्रमोद अडकिने .दीपक हाडोळे तालुका उपाध्यक्ष .विशाल पवार जिल्हा सचिव .सचिन शेळके . गोविद देशमुख .गुणवंत देशमुख . पांडूरंग आंडगे . नंदु म्हस्के . निलेश खरात . संदीप जाधव . धाडवे काका . अंकुश आडे . शिरीष बोरूळकर याच्या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थीत होते.