इतिहास विभागाद्वारे किल्ला अभ्यास दौरा  Fort Study Tour by History Department

✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

  भद्रावती (दि.3 मे ) :- स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील विभागाद्वारे, इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने भद्रावती शहरातील प्राचीन किल्ल्याला महाविद्यालयातील ५१ विद्यार्थ्यांनी भेट दिली.या अभ्यास दौऱ्यात इतिहास विभागप्रमुख डॉ. जयवंत काकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

        भद्रावती येथील प्राचीन किल्ला हा स्थलदुर्ग या प्रकारातील असून तो भद्रावतीमधील पुरातात्त्विक ठिकाणांमधील एक प्राचीन पुरातात्त्विक ठिकाण आहे. किल्ला पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित स्मारक आहे. किल्ला आज मोठ्या प्रमाणात मोडकळीस आला आहे.

किल्ला आयताकार असून सुमारे उत्तर-दक्षिण लांबी ३०० फूट तर रुंदी पूर्व-पश्चिम २७५ फूट आहे. किल्ल्याच्या भिंती साधारणता १५ ते ३० फूट जाड असून भिंतींची उंची सुमारे ३०-३५ फूट असावी. किल्ल्याच्या प्रत्येक बाजूला बुरुज आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य असून पूर्व दिशेला आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूला लहान चावडी वजा बांधकाम आहे, ते बहुदा कचेरीचे ठिकाण असावे. या चावडीवजा इमारतींमध्ये प्राचीन मुर्त्या ठेवलेल्या आहे. प्रवेशद्वाराचे दगड चुण्याने जोडलेले आहे तर तटाच्या भिंती चौकोनी घनाकार दगडाने बांधलेल्या आहे .

किल्ल्याच्या पश्चिम दिशेला एक लहान द्वार असून त्या द्वाराचे मुख उत्तर- दक्षिण दिशेला आहे. किल्ल्याच्या आत इमारतींच्या बांधकामांचे पायवावजा अवशेष आढळतात. ते निवासस्थानांचे व कामकाजासंबंधित इमारतींचे असावे. तसेच किल्ल्याच्या आत एक बारव आहे. बारवेतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग आहे. त्यातील एक मोठा तर एक लहान आहे. लहान मार्गावर कोणाडे आहे.

प्रत्येक मार्गावर प्रत्येकी तीन कमानी युक्त द्वारे आहे. बारव चौकोनी असून तीन बाजूच्या भिंती दगडांनी बांधलेल्या आहे. तर एक बाजू विटांनी बंद केलेली आहे. हे संशोधनाचा विषय ठरतात. बारवेला लागूनच महालाच्या पायऱ्याचे अवशेष आहे. बारवेपासून काही अंतरावर जातं व त्याच्या गोल गोल फरसबंदी केलेली आहे. परत बंदीच्या शेवटी गोल गोल छोटी नाली आहे. यावरून ती पीठ गिरणी असावी.

विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या मान्यतेने काढलेल्या या भेटीत महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ जयवंत काकडे यांच्यासह ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक :- मनोज गाठले .

संपर्क 9767883091