व्हाईस ऑफ मीडियाचे डिजीटल विभागाचे चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची निवड Selection of Srihari Satpute as Chandrapur District Executive Member of Digital Department of voice of Media

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.25 एप्रिल) :- 

        व्हाईस ऑफ मीडियाचे चंद्रपूर जिल्हा डिजीटल विभागाचे जिल्हा सदस्य पदावर श्रीहरी सुभाषराव सातपुते सिटीव्ही न्यूज प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली आहे. 

       सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी आज जाहीर करण्यात आली. त्यात ही निवड करण्यात आली आहे.

व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने ही कार्यकारीणी डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी जाहीर केली आहे.

जाहीर करण्यात आलेली कार्यकारीणी यामधे कार्याध्यक्षपदी – राजू बिटटूरवार (विदर्भ आठवडी), उपाध्यक्षपदी – संजय कन्नावार (चंद्रपूर क्रांती), मनोज पोतराजे (महाराष्ट्र ३४) कोषाध्यक्षपदी – अनूप यादव (संपादक-ग्लोबल महाराष्ट्र) कार्यवाहपदी- मनिष रक्षमवार (खबर महाराष्ट्राची), संघटकपदी – अरूण वासलवार (अरूणोदय) सहसंघटकपदी – संतोष येनगंदलवार (सीबीएन न्यूज) सरचिटनिसपदी- भैरव दिवसे (आधार न्यूज नेटवर्क) सहचिटनिसपदी – अशोक येरमे (मूल टूडे) जनसंपर्क प्रमुख (प्रसिध्दी प्रमुख)- सुलेमान बेग (वन समाचार) कार्यकारणी सदस्य श्रीहरी सातपुते (पुरोगामी संदेश)रंजिता नायडू (पब्लिक अॅप), कुमूदिनी भोयर (पब्लिक मीडिया) यांची निवड करण्यात आली.