अतिक्रमणधाकांचे घरकुलांचे स्वप्न केंव्हा होईल साकार

✒️विशेष प्रतिनिधी(विनोद उमरे)

चिमूर(दि.8डिसेंबर):-प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना लागू झालं आहेत.आणि गरिबांचे स्वप्न साकार झाले आहेत. पण जे गरिब असून अतिक्रमण जागेवर झोपडीत राहून घरकुल ची प्रतीक्षा करत आहे त्याच काय असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.

अतिशय गरीब अतिक्रमण धारक आहे.त्याच्या घरकुल चे स्वप्न अधुरे पडेल काय? शासनाच्या काही जि.आर मध्ये काही तरतूद असल्याने अतिशय गरीब अतिक्रमण धारक घरकुल पासुन वंचित राहावं लागतं आहे.त्यावर शासनानी शासनाच्या जी आर वर उपाय काढून गरिब अतिक्रमण धारक ला घरकुलाची मान्यता दिली पाहीजेत आणि त्याचं स्वप्न साकार करायला पाहीजेत असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहेत.

असं किती अतिक्रमण धारक चिमूर तालुक्यात मध्ये राहत आहे.पण त्यांना आता पर्यंत जागेचे पट्टे पण शासना कडून मिळाले नाही आहेत . त्यामुळे अतिक्रमण जागेवर घरकुल बांधण्याची मंजुरी देण्यात यावे अशी मागणी सुध्दा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!