बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा तर्फे शिवजयंती साजरी

312

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती(दि.21 फेब्रुवारी):- अखंड हिंदुस्थानचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा मोकाशी तर्फे साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे शिवजयंती मध्ये सर्व 14 वर्षाच्या खालील वयोगटातील शिवभक्त होते.

 बाल शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज कि जय, माँ साहेब जिजाबाई भोसले कि जय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कि जय, क्रांती सूर्य बिरसा मुंडा कि जय, डॉ बाबासाहेब आंबेडकर कि जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कि जय अशे महापुरुष चे नारे लावत घोषणा करुन, भगवे झेंडे हातात धरून गावात रॅली काढली.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाल शिवभक्तांनी व्याख्यान केले. त्यात विशेष आकर्षण म्हणून राधा रवी तुराळे वय 4 वर्ष या शिवकन्येने हातात शिव पिंड हातात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा करुन रॅलीत सहभाग घेतला.

तसेच बाल शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या गाण्यावर नृत्य सुद्धा केले.त्यावेळी शिवजयंतीचे आयोजन शिवभक्त गणेश चिडे यांनी केले.जयंतीला सहकार्य नैतिक चवरे, हर्ष सराटे, गणेश सोयाम, चेतन घेणघारे, दादू पेंदोर, दादू तोंडासे, मधु कामडी, रोशन तुराळे, सचिन चिडे, गुरु पेंदोर, संस्कार तुराळे, समस्त शिवभक्तांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येक लहान मुलांच्या डोक्यात असायला पाहिजे अशे व्यक्तव बोडखा गावातील समस्त नागरिकांनी केले.बाल शिवभक्तांनी शिवजयंती उत्सव साजरी केल्यानी समस्त नागरिकांनी व पालकांनी बाल शिवभक्तांचे कौतुक केले.