चिमूर तालुक्यात युरिया खत उपलब्ध करा

प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

✒️ शेगांव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगांव बू (दि.22 डिसेंबर):-जिल्हात व चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरबरा पेरणी झाली आहे.जिल्हात व तालुक्यात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे चिमूर तालुक्यात यूरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.याकडे कृषी विभागाणे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

शेतकरी राजाला खत बियाण्या च्या संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर चिमूर तालुक्यात खत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक. विनोद उमरे यांनी केली आहे