शेगाव (बु) पो. स्टे.अंतर्गत ग्रामीण भागात अवैध धंदे जोरात

67

🔸पोलीस प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष सा.का.विनोद उमरे यांचा आरोप

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30 मार्च) :- स्थानिक शेंगाव (बु) पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्रामीण भागातील सावरी गावात गाव खेड्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोरात सुरू असून इथे भर दिवसा ढवळ्या सर्रास पने देशी दारुची विक्री होते त्याच बरोबर सट्टा पट्टी, अवैध रेती तस्करी केला जाते असे अनेक अवैध व्यवसाय शेगांव (बु) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच नव युवक यांचे भविष्य अंधकारमय होत असल्याचे भयानक चित्र दररोज समाजात पाहायला मिळत आहे. तेव्हा विध्यार्थी युवक वर्गाच्या भविष्याचा विचार लक्ष्यात घेऊन सगळे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद उमरे यांनी केली आहे.

सविस्तर असे आहे‌ की….गेल्या वर्षी पासून शेगाव (बु)पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात अवैध धंदे सट्टा पट्टी, अवैध दारू विक्री अवैध रेती तस्करी सर्रास पने सूरु असून यांची माहिती स्थानिक पोलीस पाटील व संबंधित पोलिस प्रशासनाला दिली तरी पोलीस पाटील व पोलीस प्रशासन कसलीही कारवाई करत नाही . यावर यांच्या वर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे येथिल युवा विध्यार्थी तरुन वर्ग यांच्या भविष्याचा विचार कोणी करतांना दिसत नाही तर आज ग्रामीण भागातील गावांची परिस्थिती पाहिली असतात अनेक युवक कमी लागवडीमध्ये जास्त पैसा कमावण्याचा मार्गी लागले आहे व ओपन नेट च्या नादात मद्य प्राशन करुन दारु पिण्याच्या मार्गी लागल असल्याचे महाभयानक चित्र पाहायला मिळत आहे.

तर अवैध रेती तस्कर स्वतःला गावगुंड समजत असून आम्ही खुप मोठे रेती तस्कर असल्याची भाषा बोलत असतात .असा गावगुंडचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा तसेच परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद उमरे यांनी केली आहे.