विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत कु.तनु कन्नाके ची निवड      

390

✒️ शेगांव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.22 डिसेंबर):- नेहरू विद्यालय शेगाव (बु.) येथील वर्ग 8 वी ची विद्यार्थिनी कु. तनु कन्नाके 24 डिसेंबर 2022 ला भंडारा येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक घेऊन चंद्रपूर जिल्ह्या मधून निवड झालेली आहे. 23 नोव्हेंबर 2022 ला संपन्न झालेल्या जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत तिने 5 ही डाव जिंकत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 

प्रथमच सहभाग घेत तालुक्यातून 7 विद्यार्थ्यांची निवड चंद्रपूर जिल्हा करीता तर जिल्हा मधून एक विद्यार्थीनी विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रशिक्षक श्री.नरेन्द्र कन्नाके म.राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. रोज शाळेत सराव केल्या जातो.

 विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड झाल्या बद्दल मुख्याध्यापक श्री बी. जी. ढाकुणकर सर यांनी शाळे तर्फे चेस बोर्ड बक्षीस म्हणून देण्यात आले. निवड झाल्याबद्दल चिमूर एज्युकेशन सोसायटी चिमूर चे सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद इतर कर्मचारी वर्ग यांनी कौतुक करून अभिनंदन केलेले आहे.