जात वैधता कार्यालय प्रशासकीय भवनात तर,पक्षपाती सह आयुक्त विनोद पाटील यांचे हकालपट्टीसाठी 

🔸अभाआविपचे मंत्री गावितांना निवेदन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.25 फेब्रुवारी) :- येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय आदिवासी समाज बांधवाना संपर्कासाठी अत्यंत गैरसोईचे होत असल्यामुळे समिती कार्यालय प्रशासकीय भवनात हलविण्यात यावे तसेच खर्या आदिवासीं सोबत पक्षपातीपणे वागणार्या सह आयुक्त विनोद पाटील यांची इतरत्र हकालपट्टी करण्यात यावी.

या प्रमुख मागणीसह आदिवासींच्या विविध समस्यांसह ज्वलंत प्रश्ना सबंधी अभाआविपचे प्रदेश महासचिव आदिवासी सेवक केशव तिराणिक यांचे नेतृत्वातील शिष्ट मंडळाद्वारे वरोरा येथील शासकीय कार्यक्रमा प्रसंगी आदिवासी विकास मंत्री मा. ना.श्री डाॅ.विजयकुमार गावित यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्षह जनार्धन गेडाम,महिला कार्याध्यक्ष सौ.निलीमा आत्राम, जिल्हा सहसचिव गजानन किन्नाके,विजय तोडकर,पंढरी आत्राम आदिंची उपस्थिती होती.