चारगाव बू. येथे आरोग्य मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद

✒️ शेगांव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगांव बू (दि.22 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील चारगाव बू येथे प्राथमिक आरोग्य उप केंद्र येथे आरोग्य तपासणी उपचार शिबिर घेण्यात आले यात वृध्द प्रौढ , तरुण तरुणी , बालक , तसेच सर्व नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी केली .

          यामधे मोतीबिंदू शस्त्रक्रिया विषयी मार्गदर्शन डोळे तपासणी चष्मे वितरण . बिपी शुगर तपासणी , किशोर मुलींची तपासणी ,रक्त तपासणी ,गरोदर माता तपासणी उपचार ,०ते ५ वयोगटातील बालकांची तपासणी , अश्या प्रकारे अनेक आरोग्याची तपासणी करून उपचार करण्यात आले ..सादर हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र सावरी अंतर्गत उपकेंद्र चारगाव बू येथे ग्रामपंचायत चारगाव चे सरपंच श्री योगीराज वायदुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.. 

     यावेळी एन एस चौधरी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरी , श्री मडावी नेत्रसहाय्यक , ए. बी.बुटले , शैलेश बावणे ,संगीता मेश्राम ,आरती नागदिवे,संदीप हस्ते , पी एम वाघमारे ,एस आर प्रधान ,कुंदा इरपाते,सीमा सातपुते ,मिरा मेश्राम ,अर्चना बुच्चे ,एम एस मोहरंपुरी , सुलभा पाटील ,इंदिरा गोहने ,अश्विनी चिकणकर, सुशीला नन्नवरे ,मंगला जांभुळे , इत्यादी आरोग्य सेवक सेविका , मदतनीस ,आशा वर्कर ,यांनी मोलाचे सहकार्य केले .