शेगाव (बु)पोलीस स्टेशन हद्दीत वाढते गुन्हेगारीचे प्रमाण 

🔸वाढती गुन्हेगारी रोखण्यात शेगाव (बु)पोलीस अपयशी

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.9 ऑगस्ट) :- शेगाव पोलीस स्टेशन हे वरोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन मोठी असुध या पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास शंभर गावे येत असतात मागील काही महिन्यापासून शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये चोरी, हत्या, अवैध रेती, दारू व सरकारी स्वस्त धान्य दुकानातील मालाची तस्करी आणि खास करून बाललैंगिक अत्याचार यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

मात्र हे सगळं रोखण्यात शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार व शेगाव पोलीस हे सध्या स्थितीला अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार महिन्यात दोन हत्या, चार ते पाच बाललैंगिक अत्याचार प्रकरण, व काही प्रमाणात हत्तेच्या प्रयत्नतील प्रकरण समोर आले आहे. त्यातच भर म्हणून आता शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात भुरटे चोरांची संख्या वाढलेली आहे. गावात स्थानिक पोलीस स्टेशन असून सुद्धा गावामध्ये छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. या मुळे शेगाव पोलीस यांच्या रात्र पाळीच्या गस्तीवर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

गावातुन मोठ्या प्रमाणात अवैध देशी व विदेशी दारूचा पुरवठा भरदिवसा दुचाकी व चारचाकी वाहणातून राजरोसपाने केला जातो व विशेष म्हणेज याला कोणाचीही रोकटोक होत नाही. या वरून शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार काही प्रमाणात गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्या मुळे वरिष्ठ पो.अधिकारी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, हे आता याकडे लक्ष देतील का असा प्रश्न सध्या शेगाव पोलीस स्टेशण हद्दीतील जनतेला पडलेला आहे.