✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चिमूर(दि.9 ऑगस्ट) :-
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी चिमूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत पंचायत समिती कार्यालय येथे आढावा बैठक घेतली.
चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी चिमूर तालुक्यातील निमडेला. बोथली. रेंगाबोडी. खडसंगी. शिवापूर बंदर. सातारा. आंबोली व कोलारा येथे भेट दिली. नीमडेला येथे जलजीवन मिशन अंतर्गत कामाची पाहणी केली. तसेच शाळा व अंगणवाडी. बोथली येथील रोपवाटिका. बचतगटाचे मत्स्य व्यवसाय केंद्र. खुले विज्ञान बाग. ग्राम पंचायत व उमेद अंतर्गत बचत गटाच्या औजार बँकेस भेट दिली. रेंगाबोडी येथे एकनाथ वैध यांच्या चंदन वृक्ष लागवडीस भेट दिली. खडसंगी येथील आरोग्य केंद्र. अभ्यासिका व नमो सचिवालयाला भेट दिली.
तसेच शिवापूर बंदर येथील जनसुविधा कामाची पाहणी. शाळा व अंगणवाडीची पाहणी केली. चिमूर तालुक्यातील सर्वात सुंदर गाव असलेल्या व आर आर आबा पाटील सुंदर ग्राम पुरस्कार प्राप्त सातारा गावाला भेट दिली. सातारा गाव शिव्या मुक्तबगाव असल्याने सरपंच गजानन गुडधे यांच्या कार्याची प्रशंसा केली. आंबोली ग्राम पंचायत भवनाची पाहणी केली व कोलारा ग्राम पंचायत ला भेट देत तालुक्यातील पहिली मॉडेल वर्ग 2 ची पाहणी करत चिमूर पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेतली. सामाजिक. आरोग्य. व शैक्षणिक सुविधांवर भर देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केल्या.
आढावा बैठकीला गटविकास अधिकारी आत्मज मोरे. गटशिक्षणाधिकारी विशाल बोधाणे. कृषी अधिकारी संजय कांबळे. सहाय्यक गटविकास अधिकारी शामकुडे यांची उपस्थिती होती.







