आनंद‌ निकेतन कृषी महाविदयालयाचे रावे अंतर्गत उपक्रम पिजदुरा येथे शेतकऱ्यांना मृदा नमुना संकलन प्रात्यक्षिकाचे धडे

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.3 जून) :-उत्पादन वाढवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ,मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता जाणण्यासाठी, योग्य खत व्यवस्थापनासाठी आणि पीक उत्पादन व मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परिक्षणाचे खुप महत्त्व असते.

कृषी शिक्षणातील प्रत्यक्ष अनुभव व शेतकरी मार्गदर्शनाच्या उद्देशाने वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविदयालयाच्या कृषी शिक्षणातील प्रत्यक्ष अनुभव व शेतकरी मार्गदर्शनाच्या व ग्रामीण कृषी कार्यानुभव RAWE (रावे) कार्यक्रमाअंतर्गत खेमजई येथे मृदा नमूना संकलन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते .

त्यात विदयार्थ्यांनी विविध शेतक-यांच्या शेतातून मातीचे नमुने दिनांक 2 जून मंगळवार ला संकलित केले. यामध्ये प्रामुख्याने गावातील शेतकऱ्यांनी भाग घेतला, अजय पावडे यांच्या शेतातून मातीचे नमुने घेण्यात आले.

उपक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार, तसेच रावे प्रमुख डॉ. आर. महाजन आणि आर. व्ही तायडे, डॉ.एम.पातोंड तसेच मुद्रा विषय तज्ञ डॉ.एस .वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आले आहे. या अंतर्गत रावे च्या दुसऱ्या दिवसी मृदा नमुन्यांचे संकलन करण्यात आले.

या प्रात्यक्षिक मुंजा मसलकर ,ओम बोरे, वंश बांते, सोहम चंदनखेडे, वैभव बघे यांनी मृदा नमुना संकलनाचे महत्व तसेच माती परिक्षणाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजवून दिले. तसेच मृदा परिक्षण का आवश्यक आहे, जमिनीतील पोषक तत्त्व व घटकांची माहिती कशी मिळते, कोणते घटक आवश्यक असतात व त्यांची कमतरता व अधिकतेमुळे पिकांवर काय परिणाम होतो. मृदा परिक्षणाचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.