साई मंदिर समिती कोटकर ले आउट शेगाव येथे वृक्षारोपण संपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.9 ऑगस्ट) :- तालुक्यातील साई मंदिर समिती कोटकर लेआउट शेगाव यांच्यासंयुक्त विद्यमाने येथील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले असुन यावेळी वृक्षारोपणाचे महत्व काय ते पटवून नागरिकांनी देत का गरज आहे ते स्पस्ट करीत झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात तसेच ऑक्सिजन बाहेर टाकतात. ज्यामुळे हवा शुद्ध होते, झाडांच्या मुळ्या मातीला धरून ठेवतात.

ज्यामुळे मातीची धूप थांबते,झाडे पावसाचे पाणी धरून ठेवतात तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवतात.तर झाडे विविध प्रकारचे प्राणी, पक्ष्यांसाठी निवासस्थान, अन्न पुरवतात, ज्यामुळे जैवविविधता सुद्धा वाढते. झाडे वादळे, पूर तसेच भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करतात.झाडे आपल्याला फळे, फुले, लाकूड इतर उपयोगी वस्तू देतात, ज्यामुळे मानवी जीवनास आर्थिक लाभ मिळतो. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, कारण ते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींसाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.अशाप्रकारे मनोगत व्यक्त केले.

यावेळी धनु भाऊ कडवे, अजय लोडे ,संजय कोटकर, अमित मस्के, नंदू फुलकर,केतन केदार ,परसराम मोहीमकर, रविभाऊ वाटकर,साहील मांडवकर, नीलकंठ कावले, अर्चना कोटकर, माया लोडे,सोनू वाटकर, अरुणा फुलकर, प्रेमिला वाटकर तसेच इतर नागरिक सुद्धा उपस्थित होते.