✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 एप्रिल) :- गडचांदूर राजुरा महामार्गावरील होली फॅमिली पब्लिक स्कूल जवळ नवनिर्मित राज्यमार्गाच्या रस्ते दुभाजकावर आदळून दोन युवक युतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली सविस्तर वृत्त असे आहे की गडचांदूर मार्गे काही कामानिमित्त एका मोटर सायकल वर अनुज भोयर वय 26 वर्ष व सीता फुसाम वय 22 वर्ष दोघेही जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर जाऊन आढळले जात यांना गंभीर दुखापत झाली मात्र आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भयावह होता की दोघांनाही जागीच आपला जीव गमवावा लागला अपघाताची माहिती गडचांदूर पोलिसांना होताच घटनास्थळ गाठून पंचनामा करत दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे पाठविण्यात आले माहितीनुसार दोघेही माझी भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या गावचे असून दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते असे कळते ज्यामुळे संपूर्ण गावात शौक कडा पसरली असून पुढील तपास गडचांदूर चे थानेदार शिवाजी कदम हे करीत आहे.







