🔸चंद्रपुर जिल्हा V BA च्या महिला जिल्हा उपाध्यक्षा लिंना जी रामटेके यांच्या नेत्रात्वाखाली स्वाक्षरी मोहिम
✒️विश्वनाथ शरणांगत ब्रम्हपुरी (Brahmpuri प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी (दि.17 एप्रिल) :- महामानव बोधीसत्व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त V BA महिला जिल्हा उपाध्यक्षा लिंनाजी रामटेके यांनी भातीयांना दिल्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी महिला मंडाळाच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात हाजर होत्या .
मोजू तरी कशी.
उंची तुझ्या कर्तृत्वाची.
तू जगाला शिकवली व्याख्या.
माणसाला माणुसकीची.
समता, बंधुता, न्याय,एक महान विचारवंत, कायदेपंडित,समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व शिक्षणाचे मुर्तीमंद रूप म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…
ज्यांनी ज्ञानाच्या प्रकाशाने आणि संविधानाच्या शक्तीने देशाला दिशा दिली.
भारतीय स्वातंत्र्यानंतर जेव्हा नवे राष्ट्र घडवण्याची वेळ आली.तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.त्यांनी विविध जाती -धर्म,भाषा,आणि संस्कृती असलेल्या भारत देशासाठी एक न्याय समताधिनिष्ठ सर्वसमावेशक राज्यघटना तयार केली.भारतीय राज्यघटना तयार करणे बाबासाहेबांनी संविधान लेखनात अत्यंत महत्वाची भुमीका बजावली.त्यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता,मुलभूत हक्क, समानता, सामाजिक न्याय यासारख्या मूल्यांचा समावेश संविधानात केला.
समाजसुधारक कार्य आणि अस्पृश्यतेविरूद्ध संघर्ष केला. तसेच महीलांच्या हक्कांचे संरक्षण राज्यघटनेत महीलांना समान हक्क देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
शिक्षण आणि आत्मसन्मानावर भर .”शिका संघटित व्हा,आणि संघर्ष करा!”हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संवीधानाचे शिल्पकार नव्हे तर सामाजिक समतेचे प्रतीक आहेत.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदेमंत्री होते.त्यांनी स्वतंत्र भारतात समाजसुधारणा घडवून आणण्यासाठी हिंदू कोड बिल तयार केले.
ज्या महामानवाने समता, बंधुता आणि न्यायाचे स्वप्न साकारले.त्यांची आज जयंती.
“आजचा दिवस आहे
गौरवाचा,
उगवला एक तेजस्वी सुर्य,
समाजहितासाठी लढणारा,
ज्याने दिला संविधानाचा
अनमोल वारसा,
देशाला दिला नव्या
भविष्याचा आधारसा”…







