🔸वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करा …प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.23 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील राळेगाव येथे गावा लगत शेतामध्ये आज वाघाचे दर्शन झाले वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तसेच गाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाघ पाहण्यासाठी गर्दी केली होती गाव लगत शेत शिवारामध्ये वाघ आल्याने गावामध्ये तसेच शेत शिवारामध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले.त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेले शेतमजूर आपली हातातील कामे सोडून आपला पळ काढला. राळेगाव येथील तसेच परिसरातील नागरिकांनी या वाघाला पळविण्यासाठी हाकिलनासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले अखेर फटाक्याची आतिषबाजी करून या भागाला गावाबाहेर हकलावून लावले .
तेव्हा हा वाघ येथील याच परिसरातील शेत शिवारात दडी मारून बसल्याने या शेत शिवारात भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेल्या महिलांनी देखील आपला पळ काढला व गावाकडे परत आल्या व गावात व गाव परिसरात भिंतिचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाला अनेकदा सूचना व लेखी तक्रारी दिल्या. यामध्ये शेतीभोवताल काटेरी तारेचे कंपाऊंड करुन वाघाचा बंदोबस्त करावा असे निवेदन शेतकऱ्यांनी दिले. परंतु, वन विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.






