धावा धावा गावात वाघ आला 

🔸राळेगाव लगत शेतामध्ये वाघाचे मुक्त संचार 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव (दि.23 डिसेंबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या राळेगाव लगत शेतामध्ये आज वाघाचे दर्शन झाले वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तसेच गाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाघ पाहण्यासाठी गर्दी केली होती गाव लगत शेत शिवारामध्ये वाघ आल्याने गावामध्ये तसेच शेत शिवारामध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले.

त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेले शेतमजूर आपली हातातील कामे सोडून आपला पळ काढला. राळेगाव येथील तसेच परिसरातील नागरिकांनी या वाघाला पळविण्यासाठी हाकिलनासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले अखेर फटाक्याची आतिषबाजी करून या भागाला गावाबाहेर हकलावून लावले .

तेव्हा हा वाघ येथील याच परिसरातील शेत शिवारात दडी मारून बसल्याने या शेत शिवारात भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेल्या महिलांनी देखील आपला पळ काढला व गावाकडे परत आल्या व गावात व गाव परिसरात एकच खळबळ धावा धावा वाघ आला हिचं बोंब परिसरात पाहायला मिळाली .