चौकशी न करता व ठोस पुरावा पुरावा नसताना ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांचे विरुद्ध दाखल केलेला खंडणीचा गुन्हा परत घेणे…समितीची मागणी

✒️संतोष लांडे नांदेड(Nanded प्रतिनिधी)

नांदेड(दि.24 डिसेंबर) :- जेष्ठ पत्रकार तथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महा. राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी यांच्या बद्दल आलेल्या तक्रारीची कुठलीही चौकशी न करता थेट खंडणीचा गुन्हा दाखल करणारे वजिराबाद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांची गांभीर्याने व सखोल चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करून जेष्ठ पत्रकार कुलकर्णी यांच्या वरील खोटा व ठोस पुरावा नसताना दाखल केलेला गुन्हा त्वरित परत घेणे अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार समितीच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे कडे केली. 

जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड संस्थेच्या सचिव तथा नरसिंह विद्यामंदिर उमरदरी शाळेच्या सेविका निलाबाई जाधव यांनी दि.१३ ऑक्टोबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली की सखाराम कुलकर्णी यांनी दि १९ मार्च रोजी 50 हजार रुपये खंडणी मागितली. या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी वय -६८ वर्षे यांच्या विरोधात खंडणीचा खोटा व ठोस पुरावा नसताना तांत्रिक पद्धतीने गुन्हा दाखल केला.

जनता शिक्षण प्रसारक मंडळात जेष्ठ पत्रकार तथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुळकर्णी हे आजीव सदस्य आहेत. तक्रारदार निलाबाई जाधव ह्या सचिव पदावर आहेत. एक सदस्य सचिवाला खंडणी कसा मागू शकतो.व ७ महिन्याच्या उशिराने तक्रारदाराने तक्रार का दिली. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वास्तविक सखाराम कुलकर्णी यांची धर्मदाय न्यायालयात संस्था विरुद्ध प्रकरण न्यायप्रविष्ट असून लढाई चालू असून अंतिम टप्प्यात आली आहे.

त्यांच्या या लढाईत, कामात अडथळा निर्माण करण्यासाठी खोट्या तक्रारी देऊन गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न होत आहेत. या बाबतची माहिती कुलकर्णी यांनी ४-५ महिन्यापासून गृह मंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, यांना लेखी कळवली आहे. तसेच तक्रारदार निलाबाई जाधव यांचे आधार कार्ड खोटे आहे किंवा शाळा सोडल्याचे प्रमाण पत्रावरील जन्म दिनांक खोटा आहे. याचे पुराव्यासह पोलीस निरीक्षक वजिराबाद पोलीस ठाण्यात दि.१७ मार्च ला अर्जाद्वारे चौकशीची मागणी केली होती.

पण पोलीस निरीक्षक कदम यांनी कुलकर्णी यांच्या तक्रारीची दखल न घेता, चौकशी न करता निलाबाई यांच्या खोट्या तक्रारीची दखल घेऊन जेष्ठ पत्रकार कुलकर्णी यांचे विरुद्ध खोटा व तांत्रिक गुन्हा दाखल केला. सदरील खोटा गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक कदम यांची सखोल व गांभीर्याने चौकशी करून ठोस पुरावा नसताना खोटा व तांत्रिक पद्धतीने दाखल केलेला गुन्हा त्वरित परत घेण्यात यावा.

अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष महेश सरणीकर सह मराठवाडा समन्वयक रमेश सुरसे,मराठवाडा संघटक ओमप्रकाश पत्रे, मराठवाडा सह सचिव राजेश शिंदे, जालना जिल्हा सचिव जगन्नाथ घोडे, नांदेड जिल्हाध्यक्ष महादेव उप्पे, पैठण तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गवळी,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष माधव काईतवाड अर्धापूर शहराध्यक्ष राजेश्वर देशमुख,तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास बिरादार, नंदकुमार वलकले, यांनी पोलीस अधीक्षक अबिनास कुमार यां. व लवकरच समितीचे एक शिष्टमंडळ पोलीस महासंचालक मुंबई यांना भेटून पोलीस निरीक्षक कदम यांची तक्रार करून कार्यवाहीची मागणी करणार असल्याची माहिती दिली.