अपुरी शेतकरी कर्जमाफी व देवस्थान विधेयकास स्थगिती देण्याच्या प्रश्नावर भाजप राज्य सरकारच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यात माहुर येथे माकप व किसान सभेची निदर्शने व शासनादेशाची केली होळी

✒️शेख रफीक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.11 जून) :-

शेतकरी कर्जमाफीतील सर्व जाचक अटीशर्ती रद्द करा, सर्व राबणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, देवस्थान जमीन विधेयकाची स्थगिती रद्द करा, देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्वरित करा, व माहुर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करा या मुख्य मागण्या घेऊन आज 11जून 2026 रोजी माकप व किसान सभेतर्फे नांदेड जिल्ह्यात माहुर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुन शासनादेशाची होळी करून निषेध करण्यात आले या आंदोलनात 150 पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकर सिडाम राज्य सहसचिव 

अखिल भारतीय किसान सभा 

कॉम्रेड किशोर पवार जिल्हा सचिव 

अखिल भारतीय किसान सभा 

कॉ.संजय मानकर,कॉ.डा . बाबा डाखोरे,कॉ.प्रसराम पारडे,कॉ.शंकर गंदमवार,कॉ.दिगांमबर आगीरकर,कॉ.डा.शुभा डाखोरे कॉ राजु पिसरवाड कॉ.सुभाष डाखोरे कॉ गणपत राठोड,प्रेमसींग चव्हाण,किसन जगदाळे, वसंत चव्हाण, विजय पिसरवार इत्यादींनी केले.