✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.21 डिसेंबर) :- पशुसंवर्धन विभाग वरोरा व डी.ओ.सी.सी, एम ३ एम फाउंडेशन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या सहयोगाने मेसा येथे दूध उत्पादकता क्षमता बांधणी कार्यक्रम पार पडला आहे . हा कार्यक्रम आदिवासी उपजीविका विकास कार्यकम प्रकल्प अंतर्गत आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग वरोरा डॉ. दिलीप देशमुख ,पशुवैद्यकीय अधिकारी खेमजाई डॉ. सतीश अघडते, एस एस वर्भे डेअरी रुपेश वर्भे , श्रवण डेअरी फार्म प्रफुल वर्भे, सुमित वर्भे, कृषी विकास प्रकल्प समन्वयक अधिकारी भूमेषकुमार तांडेकर, मधुकर चौधरी, रमेश चौधरी, भोजराज वर्भे, इत्यादी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मेसा या परिसरातील असलेले शेगाव, खेमजाई , भटाळा ,आसाळा , बोरगाव, देशपांडे, बांद्रा, बिजोणी, अर्जुनी, गुंजाळा, माढेळी, पिंजदुरा, चारगाव, कोतबाळा, क्षेत्रातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग वरोरा डॉ. दिलीप देशमुख पशुवैद्यकीय अधिकारी खेमजाई डॉ. सतीश अगडते प्रशिक्षणाच्या माध्यमातून पशुधनाच्या संगोपनात सुधारणा कशी करता येईल यावर आपले विचार मांडले विशेषत; दूध उत्पादन मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्राची ओळख शेतकऱ्यांना करून देण्यात आली.
रुपेश वर्भे याची एस एस वर्भे डेअरी निर्मिती कशी तयार करण्यात आली आणि गोट्याचे व्यवस्थापन प्रात्यक्षिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना दाखवून त्यांचे मोजमाप त्यांनी समजून सांगितले. त्याचप्रमाणे श्रवण डेअरी फॉर्म वर प्रफुल वर्भे यांनी चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिक करून दाखवले आणि चारा लागवड प्रत्यक्षात शेतकऱ्यांना शेतात दाखवण्यात आले.दूध उत्पादनात वाढीसाठी सकस आहाराचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी अनिल पेंदाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन व मनीष कावळे यांनी केले.या कार्यक्रमात शंकर वर्भे, त्रुशांत तोडासे, सचिन वर्भे, रोशन मानकर, प्रबुद्ध डोये, शैलेंद्र वराडे, स्वप्निल गेडाम, शुभम दाते , यांच्यासह इतर मान्यवरांनी सहकार्य केले.






