भानुसखिंडी गेट पर्यटन सुरू करा..राजुभाऊ चिकटे कृ.उ.बा.स. वरोरा,माजी सभापती यांची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.21 डिसेंबर) :- वरोरा तहसीलमध्ये अर्जुनी तुकुम ताडोबा व्याघ्र प्रकल्प लगत कोरमध्ये असलेलं जवळपास 2000 हजार लोकसंख्या असलेलं आदिवासी गाव या गावाला लागून मोठ्या प्रमाणात ताडोबातील कोर जंगल असून नेहमीच वन्य प्राण्यांची हलचल असते या ठिकाणी शेतकरी मुख्य व्यवसाय ध्यान शेती करत असून शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय करत असतात, परंतु शेती हंगाम झाल्यानंतर येथील नागरिकांना रोजगारासाठी बाहेर ठिकाणी भटकंती करावी लागते. 

भानुसखिंडी तेरा हा गेट पर्यटन सुरू झाल्यास परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त मिळून परिसरातील आदिवासींच्या विकासाकरीता चालना मिळेल..

 वरोरा तालुक्यातील पासुन 25 किलोमीटर असलेले भानुसखिंडी गेट आहे चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर,वर्धा,भंडारा,यवतमाळ या जिल्ह्यातील नागरिकांना हा मार्ग जवळ असून गेट सुरू झाल्यात पर्यटना सोयीस्कर असणारा मार्ग आहे.

 तालुक्यातील शेगाव या ठिकाणी मोठी बाजारपेठ असून परिसरातील 60 ते 70 गावासाठी महत्त्वाची आहे अर्जुनी तु.येथे वन विभागाचे तिन कूटी असून अतिरिक्त कुटीचे नवीन बांधकाम सुरू आहे जंगलाच्या रक्षणासाठी या ठिकाणी वन कर्मचारी कायमस्वरूपी वास्तव्यात राहत असतात.

भानुसखिंडी गेट पर्यटक म्हणून सुरू झाल्यास जिल्ह्यात पर्यटक वाढून परिसरातील अर्जुनी तुकुम,कोकेवाडा,सोनेगाव किनारा,वायगाव, चारगाव, आदी गावात सहित मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून शेतकऱ्यांना छोटे कुटीर उद्योग उभे करण्यास मदत होऊन जिल्ह्यात विकासाला चालना मिळेल.

चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबाच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी पर्यटक गेट सुरू झाले असून यामध्ये जोगापुर,बल्लारशा,जुनोना,सोमनाथ, समावेश आहे.

भानुसखिंडी परिसरात, वाघ,बिबट,अस्वल,चितळ, सांबर, निलगाय,रानगवा,अनेक वन्य प्राणी असून मोठ्या प्रमाणात पक्षी सुद्धा आहे.. नेहमीच प्राणी गावालगत शेत शिवारात नागरिकांना दिसत असतात.

या परिसरात वन्य प्राण्यासाठी मुंडा,परिसर भानुसखिंडी,भानोबा,दौना,सांबरडोह,काळा आंबा या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा वन्य प्राण्यांसाठी पिण्यासाठी मिळत असल्याने नेहमीच वन्य प्राणी या ठिकाणी वास्तव करीत असतात.वन्य प्राण्यांमुळे जंगलात लगत शेती पिकांचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन पडीत आहे, वन्य प्राण्यांचे हमल्यात अनेक पाळीव प्राणी आतापर्यंत ठार झालेले आहे, त्यामुळे ताडोबातील भानुसखिंडी तेरा गेट सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवू विकासासाठी चालना मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर भानुसखिंडी तेरा गेट पर्यटकांसाठी सुरू करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा माजी सभापती राजुभाऊ चिकटे यांनी प्रशासनाला केली आहे.