✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.5 जानेवारी) :-
नगरपरिषद गडचिरोली अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. प्रभागाचे नगरसेवक रवी मेश्राम यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच विविध विकासकामे हाती घेतली आहेत.
सध्या प्रभागात नाली साफसफाईचे काम तसेच इलेक्ट्रिक पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नगरसेवक रविभाऊ मेश्राम यांनी स्थळाला भेट देत सुरू असलेल्या नाली साफसफाईच्या कामाबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी प्रभागातील नागरिकही उपस्थित होते. विकासकामे वेळेत व दर्जेदार व्हावीत, यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी नगरसेवक रविभाऊ मेश्राम यांनी सांगितले.







