गडचिरोली युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व विविध सामाजिक उपक्रम

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.6 जानेवारी) :- युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होऊन रक्तदान केल्यामुळे या उपक्रमाला खऱ्या अर्थाने सामाजिक स्वरूप लाभले. तसेच वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव एड. विश्वजीत मारोतराव कोवासे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष, हरबाजी मोरे, रुपेश टिकले, विवेक घोंगडे, प्रेमानंद गोगले, कविता उराडे, राहुल वैरागडे, प्रफुल बारसागडे, निलेश अंबादे, गणेश 

बांनबले, अंकुश नारनवरे, प्रशांत लाकडे, किशोर मंगरे, वैभव मंगरे, केदार मंगरे, सचिन बाणबलले, पंकज राऊत, लोमेश मंगरे,उपस्थित होते.